PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 3, 2024   

PostImage

जोवर मुख्यमंत्री -शिक्षणमंत्र्याशी कॉन्फरेन्स नाही, तोवर माघार नाही.. -शिक्षकदिनी बेरोजगार …


गडचिरोली : जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड, बिएड धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात आले असून प्रसिद्ध झालेल्या यादीत 70 ते 80 टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते, हा जिल्ह्यातील बेरोजगारांवर पुन्हा एकदा अन्याय होत असल्याचा आरोप बेरोजगार संगठना व आझाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आला आहे. हा अन्याय जर थांबला नाही तर बेरोजगार संघटना निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरणार असेही यावेळी सांगितले. 

 

त्यामुळे शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार हे कुणीही बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने यांचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचेशी कॉन्फरेन्स वर बोलणे होणार नाही तो पर्यंत जिल्हा परिषदेच्या दरवाजातून हटणार नाही असा इशारा निवेदनातून सीईओ ना देण्यात आला. 

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक जण पात्र असून सुद्धा भोंगळ कारभारामुळे अपात्र यादीत नाव आले त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना घेऊन आझाद समाज पार्टी लढा देणार असे आवाहन करत, 5 सप्टेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेने सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी ने केले.

 

यावेळी निवेदन देताना उपस्थित बेरोजगार युवकांसोबत आसपाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे. आदी उपस्थित होते..

-------------------

दि. 02 सप्टेंबर 2024

 

*राज बन्सोड* 

जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी 

गडचिरोली

8806757873


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 24, 2024   

PostImage

प्रेम टिकवण्यासाठी मुलगा व मुलगी पळून जातात.


जिल्ह्यातील अल्पवयीन मुली व महिला नेमक्या जातात कुठे?

 

दर महिन्याला दोन तक्रारी, सोशल मीडियाचा होतोय गैरवापर

 

गडचिरोली : मोबाईल व इंटरनेटमुळे जग अतिशय वेगाने बदलत असताना महिला व अल्पयीन मुली गायब होत असल्याच्या तक्रारी त्यांचे पालक किंवा पती पोलिस स्टेशनमध्ये करतात. त्यामुळे या महिला किंवा अल्पयीन मुली जातात कुठे असा प्रश्न सहजच पोलिस व सामान्य नागरिकांना निर्माण होते. शहरातील पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येक महिन्याला दोन तरी तक्रारी अशा स्वरूपाच्या असतात. आजच्या युगात कोणताही व्यक्ती हरवणे शक्यच नाही. सोशल मिडियाच्या वापरामुळे प्रेमसंबंध निर्माण होतात. पुढे हे प्रेम टिकवण्यासाठी मुलगा व मुलगी पळून जातात. इकडे मुलींचा पालक मुलगी गायब असल्याची तक्रार दाखल करते.

 

पालकांनी काय करावे?

 पालकांनी आपल्या मुलांसोबत मित्रत्त्वाचे संबंध निर्माण करावे. त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना प्रेम द्यावे. जेणेकरून ते बाहेर प्रेमाच्या शोधात पडणार नाही.

मोबाईलमध्ये आपली मुलगी किंवा मुलगा नेमका काय? बघते यावर लक्ष ठेवावे.

 

गहाळ बेपत्ता होण्याची कारणे

लग्नाचे आमीष : काही मुलीना पैशाचे आमीष दाखवले जाते. गरीब स्थितीतील मुली या आमिषाला बळी पडतात. काही वेळेला लग्नाचे आमीष दाखवले जाते. त्यांचे शारीरिक शोषण केले जाते. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करते.

पालकांसोबत पटत नाही : काही मुली अतिशय हेकेखोर असतात. त्या पालकाची अजिबात मानण्यास तयार नसतात. आपल्या मर्जीनुसार त्या कुठेतरी पळून जातात, मात्र पालकांना याची माहिती राहत नसल्याने ते जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात.

 

 

मुलगी जर अल्पवयीन असेल तर मात्र प्रियकराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होते. यात सहजासहजी जामीन मिळत नाही. कारागृहात जावे लागते.

 

 


PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 19, 2024   

PostImage

स्पंदन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य समाजिक दुष्टिने उल्लेखनीय.- मा.खा.अशोक …


 

गडचिरोली:- स्पंदन फाउंडेशन गडचिरोली च्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार, महाराष्ट्राचे लाडके ओबीसी नेते तथा माजी राज्यमंत्री मान.डॉ. परिणयजी फुके हे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांशी  ऑनलाईन आभासी द्वारे लाडक्या बहिणीचा देवा भाऊ ह्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीला आले असता यावेळी स्पंदन फाउंडेशनी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोज रविवारी नवेगांव(मुरखळा) सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती मान.डॉ.परिणयजी फुके यांनी बोलतांना म्हणाले एवढा मोठा सत्कार समारंभ या स्पंदन फाउंडेशन संस्थेच्यामार्फतीने केला गेला तसेच मित्र मंडळींनी सत्कारातून माझ्यावर प्रेम भावना दर्शविली हे मी जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गती निर्माण करून हे क्षण अविस्मरणीय हा क्षण लक्षात ठेवीन.असे सुचक वक्तव्य केले.

या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना स्पंदन फाउंडेशन ही एक गडचिरोली जिल्ह्यातील  सेवा भावी संस्था आहे. या संस्थेचे कार्य अतिशय सामाजिकदृष्ट्या उल्लेखनीय कार्यात अग्रेसर असुन या माध्यमातून रुग्णसेवा,आरोग्य सेवा,रुग्णसेवेसाठी मेडिकल,  रक्तदान शिबिर, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थीना मार्गदर्शन, कौशल्य विकास आधारित कार्य असे अनेक विविध सामाजिक उपक्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन करित असते.अशा या सामाजिक उल्लेखनीय संस्थेला पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा देतोय असेच काम या संस्थेच्यामार्फतीने निरंतर चालू राहो अशी मी प्रार्थना करतो.तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री परिणयजी फुके यांनी गडचिरोली जिल्हा हा आदिवासी,अविकसित, आकांक्षीत जिल्हा असून या जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपण आवर्जुन लक्ष द्यावे व आपण जनतेच्या सेवेत सदैव राहावे अशी मनोकामना करतो व पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता आपणांस शुभेच्छा देतो असे वक्तव्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून माजी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,आमदार क्रिष्णाजी गजबे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा स्पंदन फाउंडेशन चे संस्थापक व आदिवासी मोर्चा चे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा,सतिशजी चिचघरे,डॉ. प्रिया खोब्रागडे तसेच मोठ्या संख्येने संस्थेचे मित्र परिवार व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन भाष्कर बुरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे हितचिंतक कार्यकर्ते व मित्र परिवार यांनी सुरळीत पार पाडले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 11, 2024   

PostImage

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, कोरचीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक


 

गडचिरोली : कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला बलात्कारप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आतिश पंकज सरकार (वय २६, रा. कोरची) असे आरोपीचे नाव आहे.

 

 

आरोपी आतिश सरकार याने पीडित २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित युवतीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. युवतीकडील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मानण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याशिवाय पीडित युवतीकडे पर्याय नव्हता.

 

 

 

तक्रारीवरून आतिशच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ८ ऑगस्ट रोजी अटक करून त्याच दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आतिशला अटक झाल्याने वैद्यकीय एकच खळबळ माजली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 16, 2024   

PostImage

दारूच्या नशेत शाळेत शिक्षक झिंगाट; निलंबनाचा दणका अन् फौजदारीही!


 

 गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर या अतिदुर्गम गावातील जि. प. शाळेत १३ जुलै रोजी चक्क शिक्षक दारूच्या नशेत आला. याबाबत शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जि. प. सीईओ आयुषी सिंह यांनी तडकाफडकी निलंबित करून त्या शिक्षकावर फौजदारी कारवाई केली.

 

जीवनदास गेमा आत्राम असे शिक्षकाचे नाव आहे. कसनसूर जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेत १४ जुलै रोजी ते दारूच्या नशेत आले. यानंतर शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत आत्राम यांना जाब विचारला. मात्र, ते काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळेपदाधिकाऱ्यांनी थेट जि. प. सीईओ आयुषी सिंह यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेत पाठवून खातरजमा केली. यावेळी जीवनदास आत्राम यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्याविरुद्ध कसनसूर ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५५ नुसार गुन्हा नोंदविण्यात शिक्षणाधिकाऱ्यांकडून आला. अहवाल मागविला. त्यावरून शिक्षक जीवनदास आत्राम यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले.

 

बेशिस्तीला योग्य 'धडा'

 

काही शिक्षक शाळेत नियमित जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर जि.प. सीईओ आयुषी सिंह यांनी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली. मद्यपान करून शाळेत गेलेल्या शिक्षकाला निलंबित करून त्यांनी बेशिस्तीला योग्य 'धडा' दिल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

 


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024   

PostImage

EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत मा.तनुश्री ताई धर्मराव …


रुमदेव सहारे सहसंपादक 

गडचिरोली :-
तब्बल 170 जागेची झाली वाढ पोलीस भरती युवकांसाठी आनंदाचे वातावरण    
    सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस भरती मध्ये 742 शिपाई पदाच्या जागा निघाल्या  त्यात EWS आणि खुला प्रवर्गाला एकही जागा  गृहविभागाने दिला नव्हता त्या अनुषंगाने पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली यांनी पोलीस भरती तयारी करणारे युवकांना घेऊन मा. तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांचेमार्फत मा. ना मंत्री धर्मरावा बाबा आत्राम यांना 4 मार्च रोजी भेट घेतली व निवेदन दिले तात्काळ बाबा यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली व पोलीस  शिपाई पदाच्या तब्बल 170 जागेची वाढ खालील प्रमाणे  केली ई डब्ल्यूएस 50, खुला 70, एसिबिसी 50 जागेची वाढ केली त्याकरिता पोलीस भरती तयारी करणारे युवकांकडून मा.तनुश्री धर्मराव बाबा आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी व जिल्हा उपाध्यक्ष  आकाश ढाली ,कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर , व प्रंतोष विश्वास ,रणजित रामटेके,निखिल बरसगडे ,अशुतोष चांगलानी  यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे .


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024   

PostImage

GAdchiroli: गडचिरोली येथे होणार विमानतळ


Gadchiroli news: राज्यात एकूण 32 विमानतळे आहेत. यापैकी बर्‍याच विमानतळांची विकास कामे सुरू आहेत. अशा विमानतळांवरील विकासकामे कालबद्धरीत्या पूर्ण करावी, असा निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत, गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.

 

  सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकासकामांचा समग‘ आढावा फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

सोलापूर येथील बोरामनी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्देश देत फडणवीस म्हणाले की, भारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यात विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करावा. होटगी विमानतळ विकासाकरिता प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा. पुरंदर विमानतळाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन एकदाच करावे. पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये. त्यासाठी अधिग्रा‘हणाचा योग्य आराखडा तयार करावा.

 

अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन या कामाला गती द्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात मोरवी विमानतळाच्या आजूबाजूला भरपूर जागा आहे. या ठिकाणी धावपट्टी वाढविण्याला वाव असून, त्यानुसार धावपट्टी वाढविण्यात यावी, असे ते म्हणाले. यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेण्यात आला.

      


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 24, 2024   

PostImage

बहुप्रतिक्षित वडसा - गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू:- खासदार …


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली - वडसा ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. खासदार अशोक नेते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या कामाला बुधवारी खा.नेते यांनी भेट देऊन पाहणी केली.  यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी वरून १८८८ कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात ३२२ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या २० किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची  सुरुवात करण्यात आली. 

खासदार अशोक नेते यांनी रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी आकांक्षीत अविकसित जिल्हा म्हणून ओळख आहे.या जिल्ह्यात एकमेव वडसा( देसाईगंज) रेल्वे स्टेशन आहे.परंतु वडसा गडचिरोली पर्यंत बावन ५२  किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्ग  आणण्यासाठी, या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अग्रेसर असलेले विकास पुरूष  केंद्रीयमंत्री नितिन जी गडकरी यांचे शतशा आभार...
यासोबतच या कामात राज्य सरकारचा  50% यात  वाटा असल्याने विकास कामात मौलाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मान.देवेद्रजी फडणवीस व तत्कालीन वितमंत्री लोकनेते, विकास पुरूष यांची ही विकासासंबंधित मौलाची भूमिका आहे यासाठी सर्वांचे अभिनंदन व आभार मानीत रेल्वेच्या कामाची पाहणी केल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या..


खा. अशोक नेते यांनी या कामाची गती पाहून समाधान व्यक्त केले. या कामासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन गडचिरोली आणि पुढे छत्तीसगड, तेलंगणापर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे २८ जानेवारी ला सबज्युनिअर …


 

गडचिरोली :- आजच्या संगणक युगात लहान वयातच मुले  संगणकावरील व मोबाईल गेम्स तास न तास खेळत असतात त्यामुळे शारीरिक व्यायाम होत नाही त्यामुळे लहान मुलांचे शारीरिक व मानसिक विकास मंदावतो परिणामी वातावरणात बदल झाले की मुले नेहमी आजारी पडतात लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या  प्रवाहात येऊन  मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८ वर्षांपासून ते १२ वर्षापर्यंतच्या 

विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक या खेळात आवळ निर्माण होऊन आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन  अँथलेटिक्स सारख्या

खेळात तालुका, जिल्हा, राज्य व  देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण  करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमाना बायपास रोड  स्थित संजीवनी ग्राउंड येथे रिपोर्टिंग वेळ सकाळी ६:३० वाजता  गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित केलेली आहे 

या  राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांचे व मुलींचे जन्म तारीख (११ / २/ २०१६ ते १०/२/२०१८ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प व बॉल थ्रो

तर १० वर्षाआतील मुलांचे व  मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१४ ते १०/२/२०१६ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प ,गोळाफेक तर १२ वर्षाआतील मुलांचे व  मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१२ ते १०/२/२०१४ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 

६० मीटर रनिंग , ३०० मीटर रनिंग ,लांबउडी , उंचउडी , गोळाफेक या इव्हेंट मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  सहभाग घ्यावे असे आवाहन  गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांनी केले आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024   

PostImage

Gadchiroli news: तरुणाने “मोदी सरकार की भारत सरकार” यावरून चांगलेच …


गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना एका तरुणाने “मोदी सरकार की भारत सरकार” यावरून चांगलेच खडे बोल सुनावले. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावात आलेल्या वाहनावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याने संतापलेल्या युवकाने अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात ‘व्हायरल’ झाला आहे.

लिंक खालील प्रकारे

👇👇👇👇👇👇

https://twitter.com/LoksattaLive/status/1747963156721541260?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1747963156721541260%7Ctwgr%5Ee1642911dbdfb01c6eeea193aa4b5df7f8d6849e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftwitter.com%2F

भारत सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नागरिकांना विविध लाभ देण्यासाठी गावागावात प्रशासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त गावात आलेल्या वाहनांवर मोदी सरकार असा उल्लेख होता. यामुळे संतापलेल्या युवकाने कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला.

 

यासंदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात एक युवक उपस्थित अधिकाऱ्यांना यात्रा असल्याचे एक दिवस आधी का कळविण्यात आले नाही, असा प्रश्न करताना दिसून येतोय. सोबतच हे मोदी सरकार आहे की भारत सरकार असेही विचारताना दिसत आहे. युवकाने विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. अखेर गोंधळातच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. सद्या या व्हिडिओची जिल्ह्याच चर्चा आहे.